Thursday, July 10, 2008

The city that.... ohh forget it!

/* This is my first post in Marathi(मराठी)... n I guess the last :P coz m too lazy to convert the font :P */
/* १०/०७/२००८ */

आज सकाळी उठून बाहेर पडलो companyत जायला तेव्हा ८:३० वाजले होते. पाउस just सुरु झाला होता, so रिक्शा हवी होती. Gate No. 3 मधून बाहेर पडलो न लगेचच रिक्शा दिसली. म्हणल चला.. बर झाल..
त्याला विचारलं "Sion ला येणार का ?"
"गर्दी आहे. नाही येणार"
ठीके म्हणुन मी पुढे निघालो. Gate No. 1 च्या इथे कठड्यावर shoe lace बांधायला थांबलो तर तो रिक्शावाला परत आला अन माझ्या इथे थांबला. माला वाटलं साहेबांचा mood change झालेला दिसतोय. नेईल बहुतेक Sion ला.
"आत्ताच तिथून आलो. लै गर्दी आहे तिथे"
"असेल. पण मला तिथे जायलाच लागणारे"
"hmm.. ते आहेच.. पण १ तास लागेल जायला. दोन गाड्या बंद पडल्यात तिथे पाउसामुळे. "
"हाँ. ठीके.. मग ?" (इथे मला expected होता की मग नेणार का मला ?)
"मग काय. आता कोणीतरी फ़ोन करील पोलिसांना काढतील त्या बाजूला. मग पोहोचता येइल १५ मिनिटात"
"मग नेताय का sion ला ?"
"नाही हो. मला उजवीकडे जायचय"
(च्यायला मग थांबलाय कशाला @#$#)
मला कळल ह्या Man ला गप्पा मारण्याचा mood आलाय. so मी पटकन सटकलो. तरी मोठमोठ्यानी सांगत होता कशा बंद पडल्या गाड्या वगैरे.

पुढे गेलो washi नाक्याला पोहोचलो. लगेच रिक्शा मिळाली. तो हो पण म्हणला, कटकट न करता. बसलो २ मिनिटात गर्दी सुरु झाली.
"हे नेहमीचच चाललय"
(मला वाटला गर्दी बद्दल बोलतोय)
"hmm हो ना..."
"घटनेत आम्हाला काही जागाच नाहीये"
(what the hell ?) "काय ?"
"अरे शेतकर्यांना कर्ज माफ़ केलं पण कर्ज आता देणं पण बंद झालय... तरी काहीतरी केलय. माझ्यासाठी काही जागाच नाहीये घटनेत... मी म्हणजे कोण ? कामगार!!!"
(च्यायला हा पण सुरु झाला. ठीके निदान नेतोय तरी)
"दावा ठोकलाय मी. २५ वर्ष काम केलं अन ती mill बंद पडली. पण तरी ती चालू 'दाखवलीये'... अन मी काम करतोय असा दाखवून दुसर्याला देत होते पगार"
(याच्याशी घटनेचा काय संबंध आता...)
"५ september ला result आहे. ५ september म्हणजे माहित्ये ? 'शिक्षक दिन'"
(परत subject change का आता ?)
"आधी जे लोक company च्या बाजुनी होते ते आता माझ्या बाजुनी आहेत"
(good for you...)
taxies आल्या त्यांनी typical हात दाखवा रिक्शा थांबवा प्रकार चालू केला. मग उतरलो त्याला पैश्यांबरोबर 'best of luck' पण दिला अन taxiत जाउन बसलो.

"अरे मुझे लगा आपको महेश्वरी गार्डन जाना था. लेकिन गाड़ी निकाली थी तो बोला चलो छोड़ ही देता हूँ" (typical हिन्दी accent)
"hmm"
"इतना traffic... कहाँ से चालू है ये traffic"
"जादा नाही"
"अब आगे देखना... रास्तेका काम चालू है बहोत time लगेगा" बाहेर वाकून "अबे जल्दी चल ना आगे"
"काररें (cars) सस्ती हो गई है ना, कोई भी घरसे उठके कार लेता है. चलाना आना पड़ता है. फोकट मे बड़ी बड़ी गाडीयां लेके अईसी गाड़ी चलते हैं"
(आज काही खर नाही)

बोलत बोलत पोहोचलो एकदाचा. traffic असुनही ४५ मिनिटातच पोहोचलो.
नंतर ६:३० ला निघालो. बाहेर पडल्या पडल्या एक taxi दिसली.
"chembur ला येणार का ?"
"साहेब, बसा की"
chembur ला इतक्या लवकर हो म्हणलेलं पहिल्यांदाच ऐकल so just पाहिलं डोकावून तर पर्वाचाच मुलगा taxi चालवत होता...
हा शांत होता. N.M. Joshi वरुन Curry Road. Curry Road वरुन भारतमाता theater. त्यावरून straight निघालो आणि
"माझं गाव कोल्हापुर पासून १५-२० km वर आहे"
(????) "hmm"
"काही पाउस पडला नाही अजून... तुम्ही कुठले हो ?"
"पुण्याचा"
"पुणं पण मोठ्ठ आहे नाई. नोकर्या मिळतात का लगेच ?"
"तिथे taxi नसतात"
"हाँ रिक्क्षा असतात ना ?"
"हो"
"तुम्ही इथे कुठे जाता"
"cleartrip म्हणुन आहे"
"तिथून इथे chembur रोज taxiनी परवडतं का तुम्हाला"
(आवरा... अरे देईन मी पैसे. tension नको घेउस) "हो"
"किती दिवस आहात mumbaiत"
"१ वर्ष असेन mostly"
"मग नंतर परत पुण्याला का ?"
"नाही माहीत"
"पुण्यात नोकरी मिळते का हो लगेच?"
(परत ?) "तिथे mostly software field किंवा business process outsourcing ला vacancy असते"
(ते त्याच्या डोक्यावरून गेला म्हणून गप्प झाला बहुतेक)
"आता कळला का तुम्हाला road ?"
(पहिल्यावेली मला अन त्याला दोघांना road माहीत नव्हता :P)
"हो... सांगतो तुला... तू चल"
"तुम्ही इथे राहता का HP नगर मधे ?"
"हो"
"कसा काय ?"
"बहिण असते"
"बर. तसा मी chembur ला 2nd time येतोय."
असा करत करत finally पोहोचलो मी घरी...


Seriously विचारलं तर मला Pune सोडायचं नव्हत coz अशीच गप्पिष्ट लोकं असतात तिथेही...
मला वाटलं होता, इथे इतकी दगदग असेल की कोणाला वेळ नसेल, पण इथे लोक बकरा मिळण्यासाठी टपलेलेच असतात...
पहिल्याच ४ दिवसातच माझ्या knowledgeमधे बरीच भर पडली आहे.
'इथे आधी bikes कश्या नव्हत्या, आता कशा दिसायला लागल्या आहेत', 'पउसात पाणी रस्त्यावर येत तेव्हा रिक्शा कुठून नेतात', 'bike, taxi पाण्यातून कशी काढायची... बंद न पाडता...', 'दरड पडलेली कशी काढली', 'पोलीस license कसा काढून घेतात' वगैरे वगैरे...

Mumbai मधे noise pollution बरच आहे म्हणतात... I guess that's bcoz "it's The City That Never Stops Talking"...

6 Comments:

Mithila said...

Nice :)

Unknown said...

hehe....'twas fun reading..:)

Sameer said...

just came across your blog....nice post man.... and i guess you should continue to write in marathi :P

Anonymous said...

that was too good..
awesome..
keep it up
n njoy mumbai

Suyash Joshi said...

prajya lai bhari
lihit raha re baba
wel milel tase reply takuch :P

Unknown said...

1 no...aahe..!!! agadi mumbait firun aalo aasa vatala lolzzzzz[:P]