Monday, October 20, 2008

माझी Volvoगिरी

मुंबईला आल्यापासून Volvoतून प्रवास करण्याची बरेचदा वेळ येते. Express Highway चा Express पणा काढून टाकण्यात पटाईत असलेल्या Volvo चे प्रवास अणि प्रवासी या दोन्ही गोष्टींवर एक मोठ्ठा निबंध लिहिता येऊ शकेल. मी निबंध तर लिहिणार नाही, पण एक दोन गोष्टी सांगण्यासारख्या आहेत।

आपल्या 'गुंडा' प्रेमी लोकांना आवडेल अशी एक गोष्ट आजच कळली मला... आपली Neeta Volvo पण 'गुंडा'प्रेमी आहे. Seats चालू होतात तिथेच - "Driver Sit, First Aid Kit" अस rhyming केलेल दिसलं आजच. उच्चाराबरोबरच rhyme व्हाव म्हणून spelling पण change केलेल पहिल्यांदा पाहिलय. Plus ते seats चालू होतात तिथे लिहिलेला... आता driver तिथे बसणार असेल तर गाड़ी कोण चालवणार हे कळायला मार्ग नव्हता.

प्रवासी तर एक से एक hitt असतात. काहींना window seatच हवी असते. काहींना window seat नकोच असते. काहींना tyre वरची seat नको असते... जसा काही त्यांना tyre बरोबर फरफटत नेणार आहेत :)
काहींना आपली bag छातीशी कवटाळून बसण्याची सवय. काही लोक bag वर टाकून देतात... मग ती कोणाच्याही डोक्यात पडली तरी फरक पडत नही त्यांना. काही लोक seat full मागे करून बसतात. काही लोक seat मागे होत नाही म्हणून चिडचिड करत बसतात. तर काही लोकांना seat पूर्णपणे मागे करून मागच्या मुलीच्या मांडीवर दोकान ठेउन झोपण्याचा feel घेण्याची सवय. अशक्य public भरलेला असत बसमधे. अशा वेळी माझ्यासारखे "हुशार" लोक laptop किंवा mobile काढून tp करत बसतात।

इकडे Volvo वालेही कमी नसतात. आपण ७:२५ च्या गाड़ी साठी गेलो असतो. अन तिथे गाड़ी उभी असते. आश्चर्याचा धक्का बसलेलं मन अणि शरीर सावरत आपण आत चढायला निघणार तेवढ्यात एक माणूस मागून बोंबलतो "ही ६:३५ ची गाड़ी आहे... ७:२५ ची नाही". तसाच अजून एक गोष्ट म्हणजे - Semaphore प्रकार माहीत नसल्यासारखं एकच seat दोन माणसांना देण्याची वाईट सवय लाउन घेतलेली आहे त्या लोकांनी. अन एकदा तो प्रकार झाला की संपल. अर्धा तास उशीर झालाच समजा.

परवा असाच एक प्रकार घडला. एका बिचार्या बाईला असच तंगवत ठेवलं होतं. ती तशी उभी होती तात्कळत अन आपला driver म्हणतोय "अरे पिण्ट्या, जरा बीडी आण रे तिथून... " पण ही so called बिचारी बाई बोंबलली तिथूनच "अरे पिण्ट्या, आधी seat खाली करून दे जरा". :)

Overall बघता हा ५ तासांचा प्रवास seriously bore होतो. पण असा timepass कायम चालू असल्यामुळे तेवढा प्रवास अजून सहन तरी होतोय.

6 Comments:

Vedang said...

ekdum marathit kasa kay?
chan lihila aahe pan.. aspiring to be PL? mhais chi aathvan aali :)

Praj ~ said...

Mhais ashakkya ahe re...
"16 inch chya aivegi yard lihila hota" :D

Vedang said...

caffeine mhanje christie lokanchi shavapetika! :D

Praj ~ said...

rakta kasla ?? tumcha Aarderly thunklay pachapach :P

stargazr said...

nahitar hir nai modat!!jhadu shivay jhadun takla! btw..aree st chi shivneri volvo better aste :P

Jitesh Shah said...

ata kay .. iBook aali ki kasla bore hotoy pravas... ulat Volvo peksha ST ne jashil ... jast vel lagto mhanun :)