Friday, March 12, 2010

इथे वाडे आहेत का कुठले?

बरेचदा अस होतं की काहीतरी आठवायच असत पण आठवत नाही. असं जिभेपशी येउन परत जातं. माझ्याबाबतीत तर अस बरेचदा होतं. परवा मात्र दुसर्याला त्या स्थितीत पाहून खूप मजा आली.
आम्ही शुक्रवारपेठेत एका मित्राच्या घराखाली उभे होतो. असच general गप्पा मारत होतो. तेवढ्यात एक आमच्या एवढाच मुलगा आला तिथे. आम्ही गप्पा मारायच थांबलो. त्याला काहीतरी विचारायच होत पण कळत नव्हत कस विचारायच.
"umm.. इकडे कुठला umm.. वाडा आहे का?"
 एक सेकंदासाठी आम्ही गार झालो. हा काय प्रश्न आहे? मग शुक्रवारपेठेत असा प्रश्न विचारणे म्हणजे गुन्हा आहे असा आव आणत माझा मित्र म्हणला -
"म्हणजे काय? हा वाडा आहे ते बघ. तो वाडा आहे. तो तिकडे त्यापलीकडे आहे तो वाडा आहे.. तुला कुठला वाडा पाहिजे?"
आता हा part त्या मुलाला आठवत नव्हता. "umm .. नेरु.. (मग काहीतरी तोंडातल्या तोंडात) असा वाडा आहे का?"
"कुठला?"
आता त्यानी giveup मारलं. "एक काम करा तुम्ही जरा वाड्यांची नावं सांगा"
"आवरा" मी म्हणलं..
तरी माझ्या मित्रांनी एक नाव सांगितलं "हा आहे तो परुळेकरांचा वाडा आहे"
त्यानी नाही म्हणून मान हलवली.
"जोशी वाडा?"
परत नाही.. "नाही अजून सांगा.."
बास आता.. फार बील झालं.. "तुम्हाला शनिवारवाडा पाहिजे का?"
सगळे हसयला लागले. त्यानी पण smile दिली. हुशार होता तो. त्याला कळल interest गेला यांचा.
"सोडा. जाऊदेत. मी बघतो काय करायचं."
अन तो गाडीवर पुढे निघून गेला.

3 Comments:

Sameer said...

आवरा and शनिवारवाडा :D :D

They should post reader comments here... :)

And I gotta update my template with the new changes!

Unknown said...

haha :) typical you!
Shaniwar wada.. lol nice!

Vedang said...

lolz :D bichaara.