बरेचदा अस होतं की काहीतरी आठवायच असत पण आठवत नाही. असं जिभेपशी येउन परत जातं. माझ्याबाबतीत तर अस बरेचदा होतं. परवा मात्र दुसर्याला त्या स्थितीत पाहून खूप मजा आली.
आम्ही शुक्रवारपेठेत एका मित्राच्या घराखाली उभे होतो. असच general गप्पा मारत होतो. तेवढ्यात एक आमच्या एवढाच मुलगा आला तिथे. आम्ही गप्पा मारायच थांबलो. त्याला काहीतरी विचारायच होत पण कळत नव्हत कस विचारायच.
"umm.. इकडे कुठला umm.. वाडा आहे का?"
एक सेकंदासाठी आम्ही गार झालो. हा काय प्रश्न आहे? मग शुक्रवारपेठेत असा प्रश्न विचारणे म्हणजे गुन्हा आहे असा आव आणत माझा मित्र म्हणला -
"म्हणजे काय? हा वाडा आहे ते बघ. तो वाडा आहे. तो तिकडे त्यापलीकडे आहे तो वाडा आहे.. तुला कुठला वाडा पाहिजे?"
आता हा part त्या मुलाला आठवत नव्हता. "umm .. नेरु.. (मग काहीतरी तोंडातल्या तोंडात) असा वाडा आहे का?"
"कुठला?"
आता त्यानी giveup मारलं. "एक काम करा तुम्ही जरा वाड्यांची नावं सांगा"
"आवरा" मी म्हणलं..
तरी माझ्या मित्रांनी एक नाव सांगितलं "हा आहे तो परुळेकरांचा वाडा आहे"
त्यानी नाही म्हणून मान हलवली.
"जोशी वाडा?"
परत नाही.. "नाही अजून सांगा.."
बास आता.. फार बील झालं.. "तुम्हाला शनिवारवाडा पाहिजे का?"
सगळे हसयला लागले. त्यानी पण smile दिली. हुशार होता तो. त्याला कळल interest गेला यांचा.
"सोडा. जाऊदेत. मी बघतो काय करायचं."
अन तो गाडीवर पुढे निघून गेला.
Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts
Friday, March 12, 2010
Saturday, February 6, 2010
9Comments किम्मत
माणसाच्या प्राणाला किम्मत आहे. कुत्र्याच्या पिल्लाला किम्मत नाही. वाह माणसा, सर्वात मोठा मेंदू मिळाला म्हणे..
एवढ्या इमारती केल्या.. रस्ते केले. गाड़ी चालवायला शिकला. त्या बिचार्या कुत्र्याच्या पिल्लाला काय कळणार रे..
फुल्ल अल्टो चालवत आला न त्या बिचार्या कुत्र्याला धड़क मारली. मेल ते बिचारा पिल्लू.
आता त्या कुत्र्याच्या जागी माणूस असता तर लगेच पोलीस केस. ५ वर्ष जेल मधे.
पण हे माणूस नाहीये ना. त्याची चूक. मग काय? आज तिथेच कडेला पडून राहील. लोक जाता येता disgusting look देतील. उद्या कचरा उचलणारा त्याला उचलून नेईल.
प्रॉब्लम असा आहे की लोकं दिवसेंदिवस वाईट होत चालली आहेत, अन कोणाला ते कळत पण नाहीये. लोकांना वाटते आपण प्रगती करतोय. शाळेत शिकवायचे ना तुम्हाला 'इतर प्राणीमात्रांवर प्रेम करा'. तेव्हा प्रश्न पडायचा प्राणी'मात्र' म्हणजे काय? आता पडतो 'इतर प्राणी' म्हणजे काय...
'माणुसकी' आता फ़क्त माणसांनाच applicable राहिली आहे हे कळण्याइतपत डोक आहे का तुम्हाला?
--
त्या कुत्र्याच्या पिल्लाची आई
[म्हणे भारतात फ़क्त १२०० वाघ राहिले आहेत. (प्राणी वाघ; वाघ आडनावाचे लोक नाहीत) फ़क्त १२००? अरे आवरा लोकहो.. ]
Sunday, November 8, 2009
7Comments The Butterfly Effect...
परवा match मधे प्रवीण कुमार out झाला अणि माझ जेवण संपल. नंतर मला कळल की मी १ तास जेवत होतो. Normally मी १५ मिनिटात जेवण संपवतो. पण जेव्हा जेव्हा match अशा critical moments ला असते तेव्हा तेव्हा माझ्या actions slow होतात एकदम...
अस एक feeling असत की आपण इथे काहीतरी केल तर तिथे out होइल.. काही लोकांना वाटत की ते match पाहत असतील तर India हरायला लागते. मग अशा वेळी ते त्यांच्या त्यांच्या room मधे जाउन बसतात अन मग तिकडून ओरडत राहतात "काय झाल? out झाला का ??". काही लोक उभे असतात. अन मग त्यांना वाटत राहत की आपण जर परत खुर्चीवर बसलो तर wicket जाईल.
कोणीतरी just काहीतरी आणण्यासाठी आत खोलीत गेल आणि इकडे कोणी sixer मारली तर संपलच "तिथेच थांब! तू तिथे असशील तर ते चांगले खेळत आहेत.." बिचार्याची फुकट एक over आत बसून जाते. मग तो हळूच परत येतो..
Seriously, हा Butterfly Effect वरचा विश्वास, हा कमीत कमी हालचाल करण्याचा प्रयत्न match संपल्यावर next instance ला funny वाटायला लागतो. पण (मला तरी) हाच विश्वास पुन्हा match आणि जेवण एकत्र आल्यावर "एक घास बत्तीस वेळा चावावा" म्हणीची आठवण करून देतो...

Subscribe to:
Posts (Atom)